मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) खोपोली- कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे (मिसिंग लिंक) (Mumbai-Pune Expressway missing link) काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून आता कामाला वेग देण्यात आला. उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे.
या (Mumbai-Pune Expressway) प्रकल्पाच्या कामास २०१९ मध्ये दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
आता या (Mumbai-Pune Expressway) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. मुंबई – पुणे प्रवास ऑगस्टपासून आणखी सुसाट आणि सुकर होण्यास मदत होणार आहे.