Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडी

मणिपूर अपघातात ३ जवान शहीद, १३ जखमी

मणिपूर अपघातात ३ जवान शहीद, १३ जखमी

सेनापती जिल्ह्यात सैन्याचा ट्रक दरीत कोसळला


इंफाळ : मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील चांगौबंग गावात भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत बीएसएफचे 3 जवान हुतात्मा झाले, तर 13 जवान जखमी झाले.

लष्कराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जवानाने रुग्णालयात नेत असताना अखेरचा श्वास घेतला. मृत जवानांचे शव सेनापती जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.


तर जखमी झालेल्या 13 जवानांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मणिपूरच्या राज्यपाल कार्यालयाने हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करत जखमी जवानांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment