मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उद्या सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून, या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार सर्वसामान्य जनतेला कोणता दिलासा देते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय घोषणा करण्यात आल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार पडला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे ४७ हजार कोटींचा बोजा पडत आहे.
UNESCO : जगातील ४०% मुलांना ते बोलू किंवा समजतील अशा भाषेत शिक्षण मिळत नाही : युनेस्कोचा अहवाल
राज्यावर सद्यस्थिती आठ लाख कोटींहून अधिक कर्ज असून राज्य सरकारच्या उत्पन्नाचा बराचसा भाग हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते पेन्शन आणि त्याचबरोबर कर्जफेडीचे हप्ते आणि लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीवरच खर्च होत आहे. राज्याची महसुली तूट दीड लाखांत दीड लाख कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांना त्यांच्या आजवरच्या अर्थमंत्रालयाच्या अनुभवाचा पूर्ण कस लावावा लागणार आहे.त्यामुळे उद्या मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेला नेमका कोणता दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.