Saturday, April 19, 2025
Homeदेशचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांवर अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांचा हल्ला, महूतील धक्कादायक घटना

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांवर अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांचा हल्ला, महूतील धक्कादायक घटना

महू : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांवर अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांनी हल्ला केला, ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील महू येथे घडली. भारताने न्यूझीलंड विरुद्धचा अंतिम सामना चार गडी आणि सहा चेंडू राखून जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर नाव कोरले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सामनावीर आणि न्यूझीलंडचा रचिन रविंद्र मालिकावीर झाला. यानंतर महूमध्ये क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडले आणि आनंदाने नृत्य करत विजय साजरा करण्यास सुरुवात केली. आनंदोत्सव सुरू असताना अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांनी हल्ला केला. आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. काही वाहने जाळण्यात आली.

ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाने रचला इतिहास, जिंकला चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदोत्सव साजरा करत असलेले तसेच बाईकवरुन जल्लोष करत फिरत असलेले तरुण महूच्या जामा मशि‍दीच्या मार्गावरुन जात होते. या तरुणांवर मशि‍दीतून बाहेर आलेल्यांनी हल्ला केला. दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी महूतील जामा मशि‍दीचा परिसर तसेच पट्टी बाजार, सब्जी मार्केट, गफ्फार हॉटेलसह अनेक भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनाक्रमाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

दगडफेक, जाळपोळ, तोडफोड या स्वरुपात झालेल्या हिंसक घटनेत काही जण जखमी झाले. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी काही भागांमध्ये लाठीमार करुन आणि चोख बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे; अशी माहिती इंदूरच्या पोलीस अधीक्षक हितिका वत्सल यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -