USA Plane Crash : धक्कादायक! अमेरिकेत पुन्हा विमान अपघात

वॉशिंग्टन : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एक मोठा अपघात झाला आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये ५ जणांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. याविषयीची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात विमानातील (USA Plane Crash) पाचही प्रवासी बचावले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फियाच्या पश्चिमेस सुमारे ७५ मैल (१२० किमी) अंतरावर असलेल्या मॅनहाइम टाउनशिपमधील ब्रेथ्रेन व्हिलेज या निवृत्ती गृहाजवळ रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या विमानात ५ जण प्रवास करत होते. या भीषण अपघातात विमानात प्रवास करणारे पाचही प्रवासी बचावले, त्यांच्या प्रकृतीबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विमानातील सर्व लोकांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तर शेजारी असणारी अनेक वाहने नष्ट झाली.

या अपघाताची माहिती मिळताच, लँकेस्टर विमानतळावरून अग्निशमन दलाचे एक पथक काही मिनिटांतच अपघातस्थळी पोहोचले. यानंतर अतिरिक्त आपत्कालीन पथके देखील आली. तीव्र उष्णता आणि धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणणे कठीण होत होते. या अपघातात (USA Plane Crash) सुमारे एक डझन वाहनांचे नुकसान झाले.

फ्लाइटअवेअरच्या मते, विमान लँकेस्टर विमानतळावरून उड्डाण करून ओहायोतील स्प्रिंगफील्डला जाणार होते. फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने सांगितले की ते अपघाताची चौकशी करेल. जानेवारीपासून अमेरिकेत विमान अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी याविषयी माहिती देताना सांगितले की, "विमान अचानक डावीकडे वळले आणि नंतर खाली पडले. यानंतर ते लगेचच आगीच्या गोळ्यात बदलले. पिपकिनने ताबडतोब ९११ ला फोन केला आणि तो घटनास्थळी पोहोचला. त्याच्या व्हिडिओ फुटेजमध्ये ढिगाऱ्यातून काळा धूर निघत असल्याचे आणि अनेक गाड्यांना आग लागल्याचे दिसून आले. या अपघातात तीन मजली निवासी इमारत थोडक्यात बचावली."

Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात