Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Trees : मुंबईतील झाडांची वेदनांमधून अखेर झाली मुक्ती

Mumbai Trees : मुंबईतील झाडांची वेदनांमधून अखेर झाली मुक्ती

मुंबई : मुंबईत महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी महापालिकेच्या दोन महिलांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील दोन उद्यान विद्या सहायकांनी चक्क झाडांना वेदनांमधून मुक्त केले. बोरीवलीतील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५०हून अधिक वृक्षांना ठोकलेले खिळे काढून या उद्यान विद्या सहायकांनी या वृक्षांना कायमच्याच वेदनांमधून मुक्त केले असून या दिवसापासून हाती घेतलेली ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MNS Raj Thakrey : राज ठाकरेंचं वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे : भाजपा नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार

मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या वतीने महिला दिनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिला दिनानिमित्त महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील पुनम पास्टे, सुप्रिया सावंत या दोन्ही उद्यान विद्या सहायकांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. यासाठी या महिला अधिकाऱ्यांनी बोरिवली पश्चिम येथील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५० हून अधिक झाडांना ठोकलेले खिळे स्वत: पुढाकार घेवून काढले. त्यांनी तब्बल १५० ते २०० खिळे काढले आहेत.

या रस्त्यावरील झाडांसह इतर झाडांना फलक तथा बोर्ड लावले जातात. यासाठी खिळे मारले जातात तसेच तारा बांधण्यासाठीही खिळे ठोकले जातात; परंतु हे बोर्ड किंवा तारा काढताना खिळे मात्र तसेच ठेवले जातात. परिणामी हे खिळे गंजून झाडांना धोका पोहोचतो. त्यामुळे हे खिळे काढणे खूप आवश्यक असतात. या खिळ्यांमुळे एकप्रकारे वृक्षांना यातना होत असतात आणि हेच खिळे काढून एकप्रकारे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी या वृक्षांना वेदनांतून मुक्ती दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -