मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स जगभरात पुन्हा एकदा डाऊन झाले आहे. सोमवारची ही तिसरी वेळ आहे की एक्स प्लॅटफॉर्म ठप्प झाला आहे. यामुळे अनेक युजर्सना लॉग इन करताना अडचण येत आहे. डाऊन डिटेक्टर वेबसाईटवर अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.
पहिल्यांदा ही अडचण दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आली. त्यानतंर संध्याकाळी ७ वाजता लोकांना लॉग इन करण्यास समस्या आली. तिसऱ्यांदा संध्याकाळी पावणेनऊ वाजता पुन्हा एक्स डाऊन झाले. विविध ठिकाणी लोकांना अॅप आणि साईटवर समस्या येऊ लागल्या आहेत.
जगभरातील अनेक देशांमध्ये एक्सबाबत युजर्सनी तक्रारी केल्या आहेत. युके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारतसह अनेक देशांना याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे. जागतिक स्तरावर ४० हजाराहून अधिक याबाबत तक्रारी आल्या आहेत.