हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट
मटणातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात हिंदूंची होणार मटण दुकाने
मुंबई : महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मल्हार सर्टीफिकेशन डॉट कॉम’ने (Jhatka Mutton) ही सुरुवात केली असून ‘मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण’ (Malhar Certification Jhatka Mutton) ही एक नवीन संकल्पना आज पासून हिंदू समाजासाठी आणली जात आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली. यावेळी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण मंत्री नितेश राणे यांनी केले.

‘मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण’ (Malhar Certification Jhatka Mutton) या माध्यमातून आपल्याला हक्काचे मटण दुकान जिथे १०० टक्के हिंदू समाजाचे प्राबल्य असेल. कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेली नसेल. जी काही चुकीची उदाहरणं आपल्या नजरेसमोर येत आहेत ती मटणामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अमलात आणली जाणार आहे.
हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेले आहे. या ‘मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण’चा (Malhar Certification Jhatka Mutton) वापर आपण जास्तीत जास्त करावा किंबहुना ज्या मटनाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजाने खरेदी करू नये, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
यावेळी https://www.malharcertification.com/ या वेबसाईटचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी हिंदू खाटीक महासंघाचे सदस्य आकाश पलंगे, आदेश नकाते, प्रवीण साबळे आदी उपस्थित होते.