फसवणूक करणाऱ्याला एकनाथ शिंदेंचा दणका, शिवसेनेतून हाकलले

Share

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मुंबईतील नेत्याची हकालपट्टी केली. लालसिंह राजपुरोहित यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शिवसेनेच्या शिस्तभंग समितीने ही कारवाई केली. कांदिवलीतील दाम्पत्याची फसवणूक केल्याप्रकरणी लालसिंह राजपुरोहित यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई केली.

लवकरच शिवसेनेचे पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांनी ज्यांची फसवणूक केली त्या कांदिवलीतील दाम्पत्याला भेटणार आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. तर पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार लालसिंह राजपुरोहित यांच्याविरोधात कारवाई करत आहेत.

राज्याची राजधानी असूनही मुंबईत राजकीय गुंडगिरी सुरू आहे. कांदिवलीच्या दाम्पत्याचे दुकान फसवणूक करुन हडपण्यात आले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच लालसिंह राजपुरोहित विरोधात कारवाईची मागणी केली होती. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई केली. लालसिंह राजपुरोहित विरोधात पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केल्याचे कळताच त्याला पक्षातून हालकून देण्यात आले.

लालसिंह राजपुरोहित आणि त्यांचे २० ते २५ समर्थक संघटीतपणे सामान्यांची फसवणूक करतात. लोकांची घरं-ऑफिस-दुकान -झोपडी-जमिनी बळकावणे हाच त्यांचा उद्योग झाला आहे. फसवणूक प्रकरणात पोलीस गुन्हे नोंदवतात पण कारवाई करत नाहीत. यामुळे आधी लालसिंह राजपुरोहितची पक्षातून हकालपट्टी करावी. नंतर या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. या मागणीची दखल घेण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालसिंह राजपुरोहित याची शिवसेनेतून हकालपट्टी केली.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago