

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांवर अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांचा हल्ला, महूतील धक्कादायक घटना
महू : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांवर अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांनी हल्ला केला, ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील महू येथे घडली. ...
लवकरच शिवसेनेचे पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांनी ज्यांची फसवणूक केली त्या कांदिवलीतील दाम्पत्याला भेटणार आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. तर पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार लालसिंह राजपुरोहित यांच्याविरोधात कारवाई करत आहेत.
राज्याची राजधानी असूनही मुंबईत राजकीय गुंडगिरी सुरू आहे. कांदिवलीच्या दाम्पत्याचे दुकान फसवणूक करुन हडपण्यात आले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच लालसिंह राजपुरोहित विरोधात कारवाईची मागणी केली होती. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई केली. लालसिंह राजपुरोहित विरोधात पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केल्याचे कळताच त्याला पक्षातून हालकून देण्यात आले.

लालसिंह राजपुरोहित आणि त्यांचे २० ते २५ समर्थक संघटीतपणे सामान्यांची फसवणूक करतात. लोकांची घरं-ऑफिस-दुकान -झोपडी-जमिनी बळकावणे हाच त्यांचा उद्योग झाला आहे. फसवणूक प्रकरणात पोलीस गुन्हे नोंदवतात पण कारवाई करत नाहीत. यामुळे आधी लालसिंह राजपुरोहितची पक्षातून हकालपट्टी करावी. नंतर या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. या मागणीची दखल घेण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालसिंह राजपुरोहित याची शिवसेनेतून हकालपट्टी केली.