मुंबई : मध्य रेल्वे प्रमुख मार्गांवर अतिरिक्त ३४ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. होळी सणासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी या विशेष ट्रेन चालवल्या जातील.
या विशेष गाड्या पुढील दरम्यान चालतील:
मुंबई – बनारस / मऊ / दानापुर / मडगाव
पुणे – हिसार / दानापुर / मालदा टाउन आणि कलबुर्गी-बेंगळुरू
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बनारस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२ फेऱ्या)
01013 विशेष क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक १३.०३.२०२५ रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता बनारस येथे पोहोचेल.
01014 विशेष क्रमांक बनारस येथून दिनांक १५.०३.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी जंक्शन
संरचना: दोन वातानुकूलित-द्वितीय, ९ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ५ शयनयान, २ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड क्लास-कम-लगेज-कम-गार्ड्स कोच आणि १ जनरेटर कार
२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२ फेऱ्या)
01015 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक १२.०३.२०२५ रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मऊ येथे पोहोचेल.
01016 विशेष मऊ येथून दिनांक १४.०३.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ००.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, वाराणसी जंक्शन, जौनपुर आणि औंरीहार
संरचना: ८ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणी-सह-लगेज-सह गार्ड्स कोच
3) लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२ फेऱ्या)
01011 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक १०.०३.२०२५ रोजी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता दानापुर येथे पोहोचेल.
01012 विशेष दानापुर येथून दिनांक ११.०३.२०५ रोजी २१.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा
संरचना: ८ शयनयान, ८ जनरल सेकंड क्लास, २ सेकंड क्लास-कम-लगेज-कम गार्ड्स कोच.
४) लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01103 विशेष दिनांक १७.०३.२०२५ आणि २४.०३.२०२५ रोजी सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01104 विशेष दिनांक १६.०३.२०२५ आणि २३.०३.२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ८ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड क्लास-कम-लगेज-कम-गार्ड कोच आणि १ जनरेटर कार
५) पनवेल-मडगाव विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01101 विशेष पनवेल येथून दिनांक १५.०३.२०२५ आणि २२.०३.२०२५ रोजी १८.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01102 ही विशेष ट्रेन मडगाव येथून दिनांक १५.०३.२०२५ आणि २२.०३.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ८ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड क्लास-कम-लगेज-कम-गार्डचा कोच आणि १ जनरेटर कार.
६) पनवेल- चिपळूण-पनवेल अनारक्षित विशेष (८ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01017 अनारक्षित विशेष पनवेल येथून दिनांक १३.०३.२०२५ ते १६.०३.२०२५ पर्यंत २१.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01018 अनारक्षित विशेष चिपळूण येथून दिनांक १३.०३.२०२५ ते १६.०३.२०२५ पर्यंत १५.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.४५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: सोमटने, आपटा, जीते, पेण, कासू, नागोठाई, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवांखावती, कळंबनी बुद्रुक, खेड आणि अंजणी
संरचना: ८ कार मेमू
७) पुणे-दानापुर-पुणे विशेष (२ फेऱ्या)
01419 विशेष पुणे येथून दिनांक ११.०३.२०२५ रोजी १९:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.३० वाजता दानापुर येथे पोहोचेल.
01420 विशेष दानापुर येथून दिनांक १३.०३.२०२५ रोजी ०६:३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७:३५ वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक वातानुकूलित द्वितीय, १० शयनयान, ०४ जनरल सेकंड क्लास, ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन
८) पुणे – मालदा टाउन विशेष (२ फेऱ्या)
03426 विशेष पुणे येथून दिनांक २३.०३.२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १६.३० वाजता मालदा टाउन येथे पोहोचेल.
03425 विशेष मालदा टाउन येथून दिनांक २१.०३.२०२५ रोजी १७.३० वाजता आणि तिसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबा: दौंड कॉर्ड लाईन, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पटना, भक्तियारपुर, मोकामा, किऊल जंक्शन, अभयपुर, जमालपुर, सुलतानगंज, भागलपुर, कहलगाव, साहिबगंज, बडहरवा आणि न्यू फरक्का
संरचना: ०१ वातानुकूलित द्वितीय, ०४ वातानुकूलित तृतीय, ०९ शयनयान, ०३ जनरल सेकंड क्लास, ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन
९) हडपसर-हिसार विशेष (४ फेऱ्या)
04726 विशेष हडपसर येथून दिनांक १०.०३.२०२५ आणि १७.०३.२०२५ रोजी १७.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.२५ वाजता हिसार येथे पोहोचेल.
04725 विशेष हिसार येथून दिनांक ०९.०३.२०२५ आणि १६.०३.२०२५ रोजी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता हडपसर येथे पोहोचेल.
थांबा: पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, उधना, भरूच, वडोदरा, गोधरा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपुर, दुर्गापुर, जयपुर, रिंगास, सीकर, नवलगढ़, झुन्झुनू, चिड़ावा, लोहारू आणि सादुलपूर
संरचना: ०२ वातानुकूलित द्वितीय, ०४ वातानुकूलित तृतीय, ०८ शयनयान, ०४ जनरल सेकंड क्लास, ०१ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार
१०) कलबुर्गी- सर एम विश्वसरया टर्मिनल बेंगळुरू विशेष – (४ फेऱ्या)
06520 विशेष कलबुर्गी येथून दिनांक १४.०३.२०२५ आणि १५.०३.२०२५ रोजी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.०० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल.
06519 विशेष ट्रेन बेंगळुरू येथून दिनांक १३.०३.३०२५ आणि १४.०३.२०२५ रोजी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.
थांबे: शाहबाद, तडगीर, कृष्णा, रायचूर, मंथ्रालयम रोड, आदोनी, गुंतकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका
संरचना: ०२ वातानुकूलित द्वितीय, ०५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ०२ जनरल सेकंड क्लास आणि ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन
आरक्षण: या विशेष ट्रेनसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्क आकारले जाऊ शकते.
विशेष ट्रेन क्रमांक 01013, 01015, 01011, 01419 आणि 04726 साठी बुकिंग सुरू आहे.
विशेष ट्रेन क्रमांक 01103, 01101, 03426 आणि 06520 साठी बुकिंग दिनांक १०.०३.२०२५ रोजी उघडेल.
तिकिटे ट्रेन क्रमांक 01017/01018 साठी सामान्य शुल्कावर अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन यूटीएस द्वारे बुक करता येतात.
या विशेष ट्रेनच्या वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.