Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीSatellite : आसाम राज्याला पहिल्यांदाच मिळणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरू

Satellite : आसाम राज्याला पहिल्यांदाच मिळणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरू

दिसपुर : देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा स्वतःचा उपग्रह (satellite) असेल. आसाम लवकरच असे करणारे देशातील पहिले राज्य बनणार आहे. आसाम सरकारने सोमवारी घोषणा केली की त्यांचा स्वतःचा उपग्रह असेल, जो महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्याबरोबरच सीमांवर देखरेख करण्यास मदत करेल.

आसामच्या अर्थमंत्री अजंता निओग यांनी २०२५-२६ चा राज्य अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नंतर दावा केला की आसाम हे स्वतःचे उपग्रह (satellite) असलेले देशातील पहिले राज्य असेल.

Yogi government : योगी सरकार १० ते २५ हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर्स बंद करणार; १९ प्रमुख प्रस्तावांनाही दिली मान्यता

“भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या IN-SPACE (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) च्या सहकार्याने, आम्ही महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटाचा सतत, विश्वासार्ह प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आमचा स्वतःचा उपग्रह ‘असमसॅट’ स्थापित करण्याचा मानस करत असल्याचे त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.

नंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जर आपल्याकडे स्वतःचा उपग्रह असेल तर तो आपल्याला कोणत्याही परदेशी व्यक्तीविषयी माहिती मिळू शकते. अथवा बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे का याची माहीतीही मिळू शकते. पुराची आगाऊ माहिती देऊ शकेल, हवामान अहवालात मदत करू शकेल, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -