Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाविराट कोहली ‘जम्बो’ विक्रमाच्या उंबरठ्यावर

विराट कोहली ‘जम्बो’ विक्रमाच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आतापर्यंत भारताने चार सामने खेळले आहेत. त्यातील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विराटने आपली फलंदाजीतील चमक दाखवून दिली. पाकिस्तानविरूद्ध विराटने नाबाद शतक ठोकले तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटने ८४ धावांची अप्रतिम खेळी केली. आता अवघ्या पाच धावा करून विराटला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराटने दमदार शतक ठोकावे अशी भारतीयांना आशा आहे. असे असले तरीही, अवघ्या पाच धावा करुनही विराट एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आयसीसीकडून सध्या वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या जातात. या स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळताना भारताकडून सर्वाधिक धावा करण्याची संधी विराट कोहलीला आहे.

Ind vs NZ : भारत – न्यूझीलंड आमनेसामने, दुबईत रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना

भारताकडून आतापर्यंत सौरव गांगुली चार वेळा आयसीसीच्या वनडे स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळला आहेत. या चार फायनलमध्ये मिळून गांगुलीने ७०च्या सरासरीने १४१ धावा केल्या आहेत. दुसरीकडे विराटनेही आतापर्यंत आयसीसीच्या वनडे स्पर्धांमध्ये चार वेळा फायनलचे सामने खेळले असून ३४च्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहली जेव्हा फायनलच्या सामन्यात पाच धावा काढेल तेव्हा, आयसीसीच्या वनडे स्पर्धांमधील फायनल्समध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनण्याचा मान विराट कोहलीला मिळेल. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अडम गिलख्रिस्ट अव्वल आहे. त्याने आतापर्यंत आयसीसी फायनल्समध्ये सर्वाधिक २६२ धावा केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -