नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकर (७३) दिल्लीच्या एम्समध्ये (AIIMS or All India Institute Of Medical Sciences, Delhi) दाखल झाले आहेत. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारी केल्यानंतर उपराष्ट्रपतींना एम्समध्ये दाखल करण्यात आले. तातडीने उपचार सुरू करण्यात आल्यामुळे आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. एम्सचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजीव नारंग यांच्या मार्गदर्शनात एक वैद्यकीय पथक उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्यावर उपचार करत आहे. सध्या उपराष्ट्रपती जगदीप धनकर एम्सच्या क्रिटिकल केअर युविट अर्थात सीसीयूमध्ये उपचार घेत आहेत. देशाचे आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (J. P. Nadda) यांनी उपराष्ट्रपतींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रविवारी तातडीने एम्सचा दौरा केला.
उपराष्ट्रपती जगदीप धनकर दिल्लीच्या एम्समध्ये दाखल
