Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेKalyan Update : कल्याणमध्ये दोन रेडी मिक्सरनी नऊ वाहनांना चिरडले

Kalyan Update : कल्याणमध्ये दोन रेडी मिक्सरनी नऊ वाहनांना चिरडले

कल्याण : कल्याण मधून मोठी बातमी समोर आली आहे.(Kalyan Update) कल्याण पूर्वेकडील लिंक रोडवर भीषण अपघात घडला आहे. या घटनेत दोन रेडी मिक्सरनी नऊ वाहनांना धडक देऊन चिरडले आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक झाली आहे.

Women Safety : महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही

कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडला असलेला विजयनगर हा वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात सतत वाहनांची ये-जा असते. सुदैवाने अपघाताच्या वेळेस वर्दळ कमी असल्याने मोठी जीवित हानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, विजयनगरमधील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरून दोन रेडी मिक्सर वाहने पाठोपाठ उतारावरून चक्कीनाक्याकडे जात होती. उतारावर असताना एका रेडी मिक्सरचा ब्रेक निकामी झाला. मागून चाललेल्या रेडी मिक्सरच्या चालकाला समोरील रेडी मिक्सरचा ब्रेक निकामी झाल्याचे समजताच, चालकाने पुढच्या मिक्सरला रोखण्यासाठी आपला मिक्सर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या गडबडीत ब्रेक निकामी झालेला रेडी मिक्सर समोरच्या टेम्पोवर जाऊन धडकला. त्यामुळे टेम्पो बाजुच्या झाडासह दुकानांच्या समोर धडकला. टेम्पोला धडक बसल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पोची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाक्यांसह रिक्षांना बसली. बेसावध टेम्पो चालक झाड आणि दुकानांना धडकल्याने टेम्पोमधील व्यक्ती चालकाच्या केबीनमध्ये चिरडला गेला.

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तातडीने हालचाली करून क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून बाजुला केली. या अपघाताविषयी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -