अॅड. रिया करंजकर
सुधाकर याला तीन मुली असा त्यांचा परिवार होता. सुधाकर मुंबईला काही वर्षे नोकरी केल्यानंतर गावाकडे शेतीसाठी कायमचा स्थायिक झाला. शेती करत आपल्या बायको आणि मुलांचा उदरनिर्वाह करत होता. व्यवसाय भरभराटीस आल्यानंतर दोन्ही मुलींची लग्न करून दिले. आता राहिले होते एक मुलगा आणि एक मुलगी. शेवटची मुलगी म्हणून चांगल्या प्रकारे लग्न करायचा विचार सुधाकरच्या मनात होता. म्हणून तो योग्य वराच्या शोधात होता. गावाकडे चांगली नोकरी असलेला मुलगा सुधाकरला वर म्हणून मुलीसाठी मिळाला. सुधाकरने वनिताचे लग्न धूमधडाक्यात गावाकडे लावून दिले. आता आरामात मुलाच लग्न करू. तीन मुली योग्य ठिकाणी लग्न करून सुखात नांदत होत्या. एका बापाचं कर्तव्य सुधारकरने पार पाडलं होतं. वनिता लग्न झाल्यानंतर दोनदा माहेरी आली. लगेच दुसऱ्या दिवशी निघून गेली होती. त्यामुळे तिला आपल्या आई-वडिलांशी सासरच्या बाबतीत काहीच बोलता आलं नव्हतं. कारण जेव्हा ती आली होती तर तिच्यासोबत तिचा नवराही होता. त्यामुळे सुधाकरला आपली मुलगी सुखात आहे असंच वाटत होतं. पण लग्नाला सात महिने झाले नव्हते. एक दिवस वनिता आई-वडिलांना मी पुन्हा जाणार नसल्याचे सांगितले. आई-वडिलांना वाटलं काहीतरी घरगुती भांडण झालं असेल तिचं डोकं शांत झाल्यावर ती परत जाईल. ती दोघं आपल्या शेतीकामात आणि गाई-म्हशींच्या मागे व्यस्त राहिले. पाहुणे येतील तेव्हा आपण बोलू असं त्यांना वाटलं. एके दिवशी सुधाकर वनिताला घेऊन तिच्या सासरी निघाले. सासरच्या मंडळींना नेमकं काय झालं ते विचारू या. सुधाकरांनी वनिताच्या सासऱ्यांकडे विचारपूस केली. काय असेल ते सांगा आपण सगळ्या गोष्टींचा विचार करू. मुलगी खोलीत जाऊन तीन तास झाले तरी ती बाहेर येईना. सुधाकर घरी जाण्यास निघाले तेव्हा मुलीच्या रूमचा दरवाजा ठोठावला. पण रूममधून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने दारावर धक्का मारण्यात आला. दरवाजा उघडताच बघतात तर वनिताने स्वतःला आग लावलेली होती. सुधाकरने मागचा पुढचा विचार न करता जवळ असलेली घोंगडी तिच्या अंगावर टाकली. जवळच असलेल्या जावयाच्या कानाखाली मारली. सुधाकरला कळून चुकलं होतं नक्की त्याच्या मुलीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं झालं आहे. म्हणून आपल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचललं होतं. त्याच अवस्थेत तिला दवाखान्यात घेऊन गेले.
दवाखान्यात सासरची मंडळी आली नाही. पोलीस तक्रार झाली. पण आपली मुलगी बरी होईल म्हणून जावयाला अटक होऊ नये अशी विनंती सुधाकरने केली. कारण ज्यावेळी विनीताला बोलता येत होतं त्यावेळी कोणाला शिक्षा नको असं ती म्हणाली होती. २५ दिवस सुधाकर आणि त्याची पत्नी हॉस्पिटलमध्ये ये-जा करत होते. जावई मात्र येऊन बघून जात होता. मुलगी आपली काही सांगत नव्हती. जावयाला विचारलं तर तोही काही सांगत नव्हता. डॉक्टर बोलत होते मुलगी बरी होईल. काही दिवसांनी घरी घेऊन जाऊ शकता. आपली मुलगी चांगली होत आहे यातच नवरा-बायको समाधान मानत होते. ज्या दिवशी घरी नेण्याची वेळ आली त्यावेळी सुधाकरने वनिताला सासरी नेण्याचे ठरवले. तिथे नेताच गावकऱ्यांची मिटिंग घेऊन गावातल्यांसमोर वनिताच्या सासरच्या मंडळींना विचारायचे ठरवले. वनिताना जेव्हा वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, मी सगळ्यांची मीटिंग बसवलेली आहे आणि जो निर्णय होईल तो बघून तुला मी माहेरी घेऊन येणार आहे. हे शब्द ऐकल्यावर वनिताला नेमकं काय झालं ते कळेना. लगेचच अचानक ती कशीतरी करायला लागली आणि पाहता पाहता वडिलांच्या बाजूला बसलेली वनिताने आपला जीव सोडला.
सुधाकरणे २५ दिवस आपल्या मुलीची सेवा केली होती आणि घरी नेताच मात्र त्याचा निर्णय चुकला पण इतर सांगत होती मला माहेरी न्या, तरी पण सासरी न्यायची तयारी त्यांनी दाखवली कारण तिथे गावाचे मीटिंग झाली की माझ्या मुलीला कायमची माझ्याकडे ठेवेन हा त्याने विचार केला पण तो मुलीला बोलू शकला नाही. आपल्याला वडील सासरी नेता त्या धक्क्यानेच वनिताने नाक्यावरच आपला जीव सोडला. आपल्याला जो त्रास होत होता तो वनिता वडिलांना सांगू शकले नाही जाळून घेतल्यामुळे तिला धड बोलता येत नव्हतं आणि मुलीने सांगितलं होतं की, नवऱ्यालाने कोणालाच काही त्रास होऊ देऊ नका त्याच्यामुळे सुधाकरने आपल्या मुलीचा मान राखण्यासाठी त्यांना कोणती शिक्षा केली नाही. कारण आपण मुलीचा शब्द न ऐकता वनिताला सासरी घेऊन जात होतो. आता तरी तीच शब्द ऐकला पाहिजे. म्हणून आपल्या जावयाविरुद्ध आणि तिच्या सासूविरोधी कोणती तक्रार त्याने केली नाही.
आपली मुलगी विनवणी करूनही आपण तिचा ऐकलं नाही आणि तिचं ऐकलं नाही म्हणून तिचा जीव गेला या पश्चातापात सुधाकर आजपर्यंत आहे. माझ्या मुलीची काय चूक होती की, जावयाची काय चूक होती हे आपल्या मुलीकडून काहीच कळालं नाही. योग्य वेळी वनिताने आपल्या वडिलांना होणारा त्रास जर सांगितला असता तर त्यावर काहीतरी पर्याय निघाला असता, तर तिने आपल्या वडिलांना काही सांगितलं नाही. वनिताने काही न सांगता आणि सुधाकरने आपल्या मुलीचं काहीही न ऐकता आज नाहक मात्र वनिताचा जीव गमावा लागला होता.