Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

ICC Champions Trophy 2025 फायनल मॅचमध्ये युजवेंद्र चहलसोबत दिसली मिस्ट्री गर्ल

ICC Champions Trophy 2025 फायनल मॅचमध्ये युजवेंद्र चहलसोबत दिसली मिस्ट्री गर्ल

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना सुरु आहे. टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने ५० ओव्हर्समध्ये २५१ धावा केल्या.दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे. अशातच या सामन्यादरम्यान फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावाची चर्चा होत आहे. या सामन्यादरम्यान चहल एका तरुणीसोबत दिसून आला आहे. या दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरलं होत आहेत.


युजवेंद्र चहल भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी दुबईत पोहोचला आहे. तो स्टेडियमच्या कॅमेऱ्यामध्येही कैद झाला. गंमत म्हणजे त्याच्या सोबत एक तरुणीही दिसली. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चहल या तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आल्या आहेत.व्हायरल फोटोंमध्ये चहलसोबत दिसणाऱ्या तरुणीचे नाव आरजे महवश असे आहे. ती भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. तिचे आणि चहलचे एकत्र फोटो व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे धनश्री वर्मानंतर युजवेंद्र चहल आरजे महवशला डेट करत असल्याचे लोक म्हणत आहेत.


याआधीही आरजे महवशचे चहलशी नाव जोडले गेले होते. तेव्हा या डेटिंगच्या चर्चांना तिने अफवा म्हणून फेटाळले होते. पण एकत्र फायनल सामना पाहायला गेल्यानंतर खरंच चहल आणि महवशमध्ये काहीतरी सुरु असल्याचे चाहते म्हणत आहेत. फोटोंमुळे युझवेंद्र चहलच्या डेटिंग लाईफच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागल्या आहेत.

Comments
Add Comment