Thursday, May 8, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

मुंबईत आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईत आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई विभागातील उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दि. ९ मार्च रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.


मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.


/>

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. यामुळे रविवारी दिवसभरात कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही.


हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४७ पर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी – वाशी / बेलापूर / पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, सीएसएमटी – वांद्रे / गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment