ठाणे : प्लॅस्टिक पिशव्या (फुगे) प्रदूषणास कारणीभूत ठरत असून देखील फारसे कोणी गांभीर्याने याकडे बघत नाही. अशातच होलिकोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अगोदरच बच्चे कंपनी प्लॅस्टिक पिशव्यांचे पाण्याचे फुगे मारण्यासाठी तत्पर झालेले दिसतात. ठाणे शहरात फुग्यांसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या गल्ली बोळात उपलब्ध असून ” अॅडव्हान्स होळी”(Holi Special) शब्द प्रयोग वापरून फुगे मारण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र आनंदाचा बेरंग करणारे फुग्यांसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी केवळ कागदावर दिसणार का,असा सवाल उपस्थित होत आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर फुगे मारण्यास सुरुवात झाली आहे.
Kalyan Update : कल्याणमध्ये दोन रेडी मिक्सरनी नऊ वाहनांना चिरडले
लहान मुले ठिकठिकाणी पाण्याने भरलेले प्लॅस्टिक पिशव्यांचे फुगे अंगावर मारताना दिसू लागले आहेत. यातच फुगे मारताना दुखापत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी बिनधास्तपणे फुगे फेकण्याचा कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहे. पिशव्या विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई का होत नाही असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.