Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीGaurav Ahuja Pune : भर रस्त्यात थांबून अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला...

Gaurav Ahuja Pune : भर रस्त्यात थांबून अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला अटक

पुणे : पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात काल सकाळी बीएमडब्लू गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली. त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर त्या तरुणाने अश्लील हावभाव करून भरधाव कारने निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Holi Special : होळीपूर्वीच पाण्याचे फुगे भिरकवण्याच्या घटनेत वाढ

तर, या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला भाग्येश निबजीया ओसवाल शेजारी बसलेला होता. या दोघांविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केली होती. त्यातील आरोपी भाग्येश निबजीया ओसवाल याला कालच सायंकाळच्या सुमारास अटक केली होती. तर, मुख्य आरोपी गौरव आहुजाचा शोध पुणे पोलीस घेत होते.

त्याच दरम्यान गौरव आहुजा याने त्याच्याकडून झालेल्या कृत्याबाबत माफी मागत असलेला व्हिडिओ समोर आला. त्यानंतर गौरव आहुजा याला पुणे पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पोलिस किती वाजता हजर करतात आणि काय युक्तीवाद होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -