Sunday, August 31, 2025

मुंबईत पाण्याची टाकी साफ करताना पाच कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू

मुंबईत पाण्याची टाकी साफ करताना पाच कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू
मुंबई : मुंबईतील नागपाडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या खासगी इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करत असताना गुदमरल्यामुळे पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. टाकीत कर्मचारी गुदमरल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याचे सांगितले. मिंट रोड, नागपाडा या ठिकाणी रविवार ९ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. खासगी कंत्राटाचा भाग म्हणून कर्मचारी टाकी स्वच्छ करत होते.
Comments
Add Comment