Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिक'ती'ची गोष्टविद्याधनं सर्वधनं प्रधानम्...! - वैशाली पाटील

विद्याधनं सर्वधनं प्रधानम्…! – वैशाली पाटील

मुंबई (साक्षी माने) : आयुष्याच्या रंगमंचावर आपल्या आगळ्या-वेगळ्या भूमिकेने सगळ्यांना आपलेसे करणारी आणि मी काहीही करू शकते हे वेळोवेळी सिद्ध करणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. आज संपूर्ण जगभरात पाहिले तर असे लक्षात येते की, महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली असून काबाडकष्ट करून आणि आपली प्रत्येक जबाबदारी पार पाडल यशाचे अनेक उंच शिखर गाठले आहेत. अशा अनेक तेजोमय ज्योती आहेत ज्यांनी त्यांच्या झळकत्या विचारांने आणि आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे आहे या भावनेने कर्तृत्वाच्या जोरावर समाजात एक सकारात्मक छाप उमटवली आहे. तसेच पुरुष हा सायकलचे पुढचे चाक असले तर स्त्री हे सायकलचे मागचे चाक असते कारण हँडल जरी पुढच्या चाकाला असले तरी मागच्या चाकाला पेंडल, सीट, सायकलची चैन जोडलेली असल्याने मागच्या चाकावर जबाबदारीचे ओझे हे जास्त असते’ या सिंधुताई सपकाळ यांच्या या शब्दांना खरे करणाऱ्या अनेक स्त्रिया त्यांच्या अलौकिक कामांनी यशाला गवसणी घातल आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘वैशाली आनंद पाटील’. वैशाली पाटील या एक अशा स्त्री व्यक्तिमत्व आहेत ज्या त्यांच्या नावाप्रमाणे अतिशय प्रभावशाली, कर्तबगार, वैविध्यपूर्ण ज्ञानाच्या बळावर स्त्री ही किती विलक्षण असले हे त्यांचा प्रवास पाहताच लक्षात येते.

Actress Madhura Welankar : स्त्रीने स्त्रीचा सन्मान करणे महत्त्वाचे…- अभिनेत्री मधुरा वेलणकर

कच्ची गुजराती कुटुंबात संगोपन होत असताना आपल्या सगळ काही सहज मिळू शकते हे माहिती असूनही आपली काहीतरी वेगळी ओळख असावी आणि सरळ सोप्या मार्गाने नाही तर मेहनतीने पुढे जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला. कुटुंबाचा स्वतःचा व्यवसाय असूनही बिझनेस न करता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या क्षेत्रात यशस्वीरित्या यश संपादित केल्यामुळे त्यावेळी ही कशाला करते इंजिनीअरिंग, हिला जमेल का असे म्हणणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु त्यांनी एवढ्यातच आनंद न मानता स्वतःला आणखीन आजमावून पाहिले. एमएलएस, कथक विशारद, एमए (परफॉर्मिमग आर्टस) अशा अनेक पदव्या आपल्या ज्ञानाच्या जोरावर टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या. एका मुलीचे शिक्षण पूर्ण होताच घरात ‘लग्न करायची हीच उत्तम वेळ’ हे सुरू गायले जातात. परंतु, लग्न न करता आणखी काही वेगळे करता येणे शक्य आहे का हा विचार करत असताना आपल्या आईच्या म्हणण्यानुसार, एमपीएससी राज्य सेवा (Maharashtra Public Service Commission) या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

ही स्पर्धा परीक्षा म्हणजे त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट अर्थात आणखीन एक नवीन संधी. या संधीचं सोन करत त्या इंटरव्यूपर्यंत पोहोचल्या परंतु काही कारणास्तव त्यांची निवड झाली नाही मात्र, स्टेट सर्विसेसमध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. यादरम्यान त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी कोणताही पदभार स्वीकारला नाही. मात्र या तयारी दरम्यानच्या काळात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी आपसूकच घडल्या. आयआयएस अभ्यासक्रमाच्या तयारी पूर्वी नेमके काय करायचे आणि कसे हा प्रश्न समोर उभा होता मात्र त्याचे उत्तर एका वृत्तपत्रामधल्या छोट्याशा जाहिरातीने दिले आणि आयआयएस, यूपीएससी, एमपीएससीच्या गाइड्न्स् क्लासेस अर्थात स्टडी सर्कलशी त्या जोडल्या गेल्या. स्टडी सर्कल हे तेव्हा नुकतेच नावारूपाला आलेले असून विद्यार्थ्यांच्या बुद्धी, क्षमता व सामर्थ्य ह्याचा चांगला अंदाज घेत बहुजन समाजाच्या मुलांनी विकासात यावं यासाठी सर्जन सारखा व्यवसाय बाजूला ठेवून आयपीएस उत्तीर्ण असतानाही होतकरू विद्यार्थ्यांना पुढे आणून अभियांत्रिकी व वैद्यकीय ज्ञान व सेवा ग्रामीण भागात पोहोचविण्याच्या उद्देशाने डॉ. आनंद पाटील यांनी हे शिक्षण संकुल उभारले. या संकुलनाचा त्यासुध्दा एक भाग असताना नकळत त्या डॉ. आनंद पाटील यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाल्या. त्या गुजराती आणि इंजिनीयर तर डॉ. पाटील हे मराठी आणि डॉक्टर असे वैविध्य असले तरी समाजासाठी काहीतरी करायचे हा विचार मात्र एक होता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वायत्त, धर्मनिरपेक्षत, लोकशाहीवादी विचारांनी काम करण्याच्या त्यांच्या शैली मध्येही साम्य होते.

त्याचप्रमाणे मिस टू मिसेस या प्रवासात त्यांची आणखीन एक नवीन ओळख निर्माण झाली. तसेच त्या स्टडी सर्कलची जोडल्या गेल्या. १९९४ पासून त्यांनी स्टडी सर्कलचा कार्यकारी संपादक हा पदभार स्वीकारला व आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांमध्ये या स्पर्धा परीक्षांविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी तालुका न तालुका पिंजून काढला. मराठीत स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भात एकमेव मासिक, अनेक पुस्तके त्यांनी मिळून २००० सालापासून प्रकाशित करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे असे अनेक अनुभव घेत असताना एक नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे ‘मराठी स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन’. प्रशासकीय अधिकारी, विचारवंत, साहित्यवंत, राजकीय व्यक्तीमत्व यांनी मुलांसमोर येऊन त्यांचे विचार मांडावेत ज्यामुळे मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी एक दिशा मिळेल या उद्देशाने कोणाकडून ही आर्थिक साहाय्य न घेता दोन दिवसांसाठी घेण्यात येणाऱ्या या संमेलनाची सुरुवात २०१० पासून झाली असून त्यांनी २०१० ते २०२३ पर्यंत १२ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन घेतली. तसेच त्यांनी खेड्यापाड्यातील मुलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. मॉक इंटरव्यू सारखे अशक्य उपक्रम त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा ग्रामीण भागातील घराघरात पोहोचविले. अर्थात काही वेळा ते अशक्य होते पण शिक्षणाचा प्रसार करण्याची ती धमक असल्यामुळे अशक्यही शक्य झाले. हे समाजासाठी काम करत असताना अनेकांनी कौतुकाची थाप मारत भरभरून आशीर्वाद ही दिले. तसेच जेव्हा त्यांचे विद्यार्थी एका विशिष्ट पदावर काम करताना दिसायचे तेव्हा त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळायची. कोणालातरी मागे ओढून किंवा चुकीच्या पद्धतीने पुढे जाऊन मिळणारे यश जास्त काळ टिकत नाही म्हणून सकारात्मक हेतूने ते काम करण्याची कार्यप्रणाली त्यांनी स्वीकारली. तसेच त्या फक्त स्टडी सर्कलची सीमित न राहता त्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी अचूक पार पडल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -