सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीत राहायला असलेल्या १२ बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका ठेकेदारामार्फत आसाममार्गे ते भारतात आल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याकडे तमिळनाडू, त्रिपुरा व पश्चिम बंगाल येथील आधारकार्ड व पॅनकार्ड आढळली आहेत. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्यांच्या चौकशीसाठी सोलापूर शहर पोलिसांची पथके त्याठिकाणी जाणार आहेत.
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील दोन वेगवेगळ्या उद्योगात कामाला असलेल्या १२ बांगलादेशी तरुणांना एमआयडीसी पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनीही या बाबीला गांभीर्याने घेतले आहे.
Actress Madhura Welankar : स्त्रीने स्त्रीचा सन्मान करणे महत्त्वाचे…- अभिनेत्री मधुरा वेलणकर
आधारकार्डसाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे कोणी मिळवून दिली, आसाममार्गे त्यांना भारतात घेऊन येणारा तो ठेकेदार कोण आणि १२ बांगलादेशी सोलापुरात कोणाच्या मदतीने आले, त्यांच्या ओळखीचे अन्य बांगलादेशी तरुण सोलापूर जिल्ह्यात कोठे आहेत का? या बाबींचा कसून तपास सुरू आहे. पुढील दोन दिवसांत तपासात बऱ्याच बाबी स्पष्ट होतील, असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.