Monday, August 25, 2025

PM Modi : महिला दिनानिमित्त पंतप्रधानांकडून महिला शक्ती आणि कामगिरीला सलाम

PM Modi : महिला दिनानिमित्त पंतप्रधानांकडून महिला शक्ती आणि कामगिरीला सलाम

नवी दिल्ली : महिला शक्ती आणि कामगिरीला सलाम म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या यशस्वी महिलांना सोपवले आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनी, यशस्वी महिला पंतप्रधानांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या कथा आणि विचार सामायिक करीत आहेत.

 पंतप्रधानांच्या एक्स या समाजमाध्यमावरील अकाउंटवर यशस्वी महिलांनी पोस्ट केले की: "अंतराळ तंत्रज्ञान, अणु तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरण... आम्ही दोघी अर्थात एलिना मिश्रा, अणुशास्त्रज्ञ आणि शिल्पी सोनी, अवकाश शास्त्रज्ञ आहोत आणि आम्हाला #महिलादिनी पंतप्रधानांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नेतृत्व करताना खूप आनंद होत आहे. आमचा संदेश - भारत हे विज्ञानासाठी सर्वात चैतन्यशील ठिकाण आहे आणि म्हणूनच, आम्ही अधिकाधिक महिलांना ते शिकण्याचे आवाहन करतो."
Comments
Add Comment