
पाकिस्तानच्या खेळाडूंना तर आयपीएलमध्ये प्रवेश नव्हता, मग या खेळाडूला कशी एंट्री दिली, हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. पण या प्रश्नाचे उत्तरही आता समोर आले आहे. कारण या खेळाडूने आता युनायडेट किंगडमचे नागरिकत्व पत्करले आहे. त्यामुळे त्याला आता आयपीएलमध्ये एंट्री मिळू शकते, यापूर्वी अशीच एंट्री पाकिस्तानच्या अझर मेहमूदला दिली होती. पण आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज युनायडेट किंगडमचे नागरिकत्व घेऊन आयपीएल खेळणार आहे आणि या खेळाडूचे नाव आहे मोहम्मद आमीर.

Ind vs NZ : भारत - न्यूझीलंड आमनेसामने, दुबईत रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असलेल्या या सामन्याचे थेट ...
मोहम्मद आमीरने आपल्या वेगवान गोलंदाजीने क्रिकेच विश्व गाजवले होते. मोहम्मद आमीरला मॅच फिक्सिंग प्रकरणात बंदीही घातली होती. त्यामधून तो सुटला आणि तो पाकिस्तानमधून खेळत होते. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये दाखल झाला आणि तेथील नागरीकत्व त्याने घेतलेले आहे.
त्यामुळे मोहम्मद आमीर आता पुढच्या आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतो. आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंवर बंदी आहे आणि ही बंदी अजूनही कायम आहे. त्यामुळे थेट पाकिस्तानच्या संघातील खेळाडू आयपीएल खेळू शकत नाही.