नवी दिल्ली : आयपीएलचे १८वे पर्व २२ मार्चपासून सुरु होणार आहे. या पर्वात जेतेपदासाठी सर्वच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. पण पंजाब किंग्ज भलत्याच कारणामुळे ट्रोल होत आहे. जर्सीत केलेला बदल पाहून नेटकरी ट्रोल करत आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने आधीच नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. आता पंजाब किंग्जनेही त्यांचा आयपीएल २०२५ चा किट रिलीज केला आहे आयपीएल सीझन १८ साठी पंजाब किंग्जने अनावरण केलेल्या जर्सीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
‘स्वामी समर्थ श्री २०२५’साठी १२५ जण दाखवणार शरीरासौष्ठव, विजेत्यांसाठी ३ लाखांची बक्षीसे
मागच्या पर्वात घातलेल्या त्याच जर्सी डिझाइनसह पंजाब किंग्ज संघ मैदानात उतरणार आहे. नवीन जर्सीमध्ये फक्त एकच बदल केला आहे. यात फक्त एक अतिरिक्त बटण वाढवलं आहे.यापूर्वी जर्सीला दोन बटणे होती, परंतु यावेळी ती तीन करण्यात आली आहेत. तीन बटणांची जर्सी आता नवीन डिझाइनची जर्सी म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
पंजाब किंग्ज २५ मार्च रोजी तीन बटणे असलेली नवीन जर्सी घालून मैदानात उतरेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाचा पहिला सामना गुजरात टायटन्स असणार आहे. पंजाब संघ या सामन्याने आयपीएल मोहिमेची सुरुवात करेल.
पंजाब किंग्ज संघ: श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, विजय कुमार वैशाख, यश ठाकूर, मार्को जानसेन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्लाह उमरझाई, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश, झेवियर ब्रॅटलेट, पैला अविनाश, प्रवीण दुबे, नेहल वधेरा, हरनूर पन्नू, कुलदीप सेन.