Tuesday, March 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRohini Khadse demands : "आम्हाला खून करण्याची परवानगी द्या"

Rohini Khadse demands : “आम्हाला खून करण्याची परवानगी द्या”

रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे मागणी

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी “आम्हाला खून करण्याची परवानगी द्या”, अशी मागणी राष्ट्रपतींकडे थेट पत्राद्वारे केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढलं आहे. या अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांच्यावर तलवार उपसण्याची, त्यांचा खून करण्याची परवानगी द्या, असं रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकमध्ये चाललंय काय ? सिद्धरामय्यांच्या राज्यात दोन महिला पर्यटकांवर सामूहिक बलात्कार, पीडितांपैकी एक इस्रायलची नागरिक

रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पत्र….

मा. द्रौपदी मूर्मू
राष्ट्रपती, भारत

विषय – एक खून माफ करणेबाबत..

महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…

आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय! विचार करा काय परिस्थिती असेल?

नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा, अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.

आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती. मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.

आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची (Rohini Khadse) मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -