Thursday, March 20, 2025
Homeमहामुंबईस्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त २५० कोटींची मागणी

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त २५० कोटींची मागणी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मंत्रालयात बैठक

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला अधिक गती देण्यासाठी आणि काम उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाढीव २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासमवेत शुक्रवारी मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, आमदार राजेश मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. यानंतर येथील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा देखील महापालिकेत समावेश करत त्यांना मोठा दिलासा देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता २७ गावांतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागावा यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २७ गावातील नागरिकांना घरोघरी मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

मुर्खांकडे लक्ष देऊ नकोस

या योजनेची कामे अधिक जलदगतीने व्हावी यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे २५० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी केली. याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या समवेत मंत्रालयात आढवा बैठक पार पडली. याबैठकी दरम्यान पाणीपुरवठा योजना जलदगतीने राबविण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बायोरेमेडिएशन पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे नियोजित करण्यात येत आहे. सुमारे ७८ कोटी रुपयांचा निधीतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. २७ गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत समावेश झाल्यामुळे स्थानिक संस्था करापोटी वाढीव अनुदान देण्यात यावे. २०२३-२०२४ व २०२४-२०२५ कालावधीतील कल्याण-डोंबिवली मनपा हददीतील प्राप्त झालेल्या १ टक्के मुद्रांक शुल्क अधिभार रक्कम महापालिकेला देण्यात यावी.

डोंबिवली मोठागाव ठाकुर्ली येथील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील फाटक क्रमांक १ ऐवजी प्रस्तावित चौपदरी उड्डाणपुलाबाबत अर्थातच डोंबिवली मोठागाव ठाकुर्ली रेल्वे पुलाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासाठी वाढीव निधी देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -