Sunday, March 23, 2025
Homeक्रीडा'मुंबई श्री'चे पोझयुद्ध कोण जिंकणार ?

‘मुंबई श्री’चे पोझयुद्ध कोण जिंकणार ?

मुंबई : मुंबई शरीरसौष्ठवाची खरी संपत्ती शुक्रवारी मुंबईकर क्रीडाप्रेमींना याची देही याची डोळा बघायला मिळणार आहे. त्यात कुणाचे बायसेप्स भारी असतील तर कुणाचे ट्रायसेप्स… काहींची छाती पाहून प्रेक्षकांचे उर भरून येईल तर कुणाची शोल्डर पाहून लय भारी वाटेल… वरच्या गटात तर काफ, थाइज, अ‍ॅब्ज आणि बॅक मसल्स म्हणजे जणू काही बारीक नसानसांचे विणलेले जाळेच असल्याचा अनुभव येईल… अत्यंत जोशपूर्ण वातावरण लोखंडवाला कॉम्पलेक्सच्या सेलिब्रेशन क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे पार पडणार्‍या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत शरीरसौष्ठवाचा सळसळता उत्साह पाहाण्यासाठी शरीरसौष्ठवप्रेमींचा जनसागर उसळणार हे निश्चित आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून मुंबईच्या शरीरसौष्ठवाला नवा विजेता लाभणार आहे.

‘मुंबई श्री’च्या खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी खानविलकरांचे आर्थिक पाठबळ

गेली चार महिने ज्या स्पर्धेत आपले पीळदार स्नायू दाखविण्यासाठी मुंबईचे युवा शरीरसौष्ठवपटू व्यायामशाळेत तासनतास घाम गाळत आहेत त्या मानाच्या आणि हक्काच्या मुंबई श्री स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा होत नसली तरी उद्या थेट स्पर्धेसाठी मुंबईतील तब्बल दोनशेपेक्षा अधिक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावतील. २०० पैकी ४० खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असून प्रत्येक खेळाडू रोख पुरस्काराचा मानकरी ठरेल. प्रत्येक गटात किमान २० खेळाडू असल्यामुळे त्यापैकी पाच खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करताना रेप्रâीजना डोळ्यांत तेल घालून निरीक्षण करावे लागणार आहे.

मुंबई श्री चा धमाका ७ मार्चला

शरीरसौष्ठवपटूंना मालामाल करणार्‍या या स्पर्धेला पुरस्कर्त्यांचा आणि कॉर्पोरेट जगताचा अपेक्षित पाठिंबा लाभला नाही. त्यामुळे स्पर्धेला अनंत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले तरीही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आणि हितचिंतकांना मदतीचा हात दिल्यामुळे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने पुन्हा एकदा भव्य दिव्य स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलले आहे. त्यामुळे शुक्रवारीही मुंबई श्रीची भव्यता तशीच दिसेल, असे आश्वासन संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिले.

‘मुंबई श्री’साठी काँटे की टक्कर

या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेसह महिलांचे शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्ट्स असे तीन प्रकार स्पर्धेत उतरणार आहे. अर्थातच मुंबई श्री स्पर्धेतील मुख्य फेरीतील ८, फिजीक स्पोर्ट्सचे २ आणि महिलांचा एक अशा ११ गटांमधून किमान २५० खेळाडू आपले पीळदार स्नायू दाखवतील. गणेश उपाध्याय, संदीप सावळे, भगवान बोराडे, विशाल धावडे, उबेद पटेल, संकेत भरम, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अरुण नेवरेकर, अमति साटम, संजय प्रजापती, अमोल जाधवसारखे खेळाडू आपल्या पीळदार सौष्ठवाच्या जोरावर मुंबई श्रीला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करतील. पण या खेळाडूंच्या व्यतिरिक्त काही असेही खेळाडू समोर येतील ज्यांना यापूर्वी मुंबईकरांनी पाहिलेही नसेल. तयारीतील खेळाडू मुंबई श्रीच्या किताबासाठी आपला दावा ठोकतील. त्यामुळे मुंबई श्री साठी पुन्हा एकदा काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी माहिती बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेश सावंत यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -