Thursday, October 16, 2025

कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे कसारा स्थानकावर दि. ०८.०३.२०२५ (शनिवार) आणि दि. ०९.०३.२०२५ (रविवार) रोजी आरओबी गर्डर (टप्पा-१) च्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक खालीलप्रमाणे परिचालीत करणार आहे. पहिला ब्लॉक दि. ०८.०३.२०२५ (शनिवार) रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर असेल. दुसरा आणि तिसरा ब्लॉक दि. ०९.०३.२०२५ (रविवार) रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० आणि दुपारी ४.०० ते संध्याकाळी ४.२५ पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर असेल.

ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांचे शार्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन दि. ०८.०३.२०२५ (शनिवार) आणि दि. ०९.०३.२०२५ (रविवार) रोजी सकाळी ९.३४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कसारा लोकल (एन-११) आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. दि. ०९.०३.२०२५ (रविवार) रोजी दुपारी १.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कसारा लोकल (एन-१९) कल्याण येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. कसारा येथून दि. ०८.०३.२०२५ (शनिवार) आणि दि. ०९.०३.२०२५ (रविवार) सकाळी ११.१० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-१६) लोकल ट्रेन आसनगाव येथून सुटेल. कसारा येथून दि. ०९.०३.२०२५ (रविवार) रोजी १६.१६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-२६) लोकल कल्याण येथून सुटेल. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >