Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Metro Update : मुंबई मेट्रोचे कोणते मार्ग कधी सुरू होणार? देवेंद्र...

Mumbai Metro Update : मुंबई मेट्रोचे कोणते मार्ग कधी सुरू होणार? देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती!

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई मेट्रो प्रकल्प (Mumbai Metro) महत्त्वाचे मानले जातात. काही मेट्रो मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून त्या सेवा देत आहेत. तर काही मार्गिकांचे काम अद्याप सुरू आहे. काही प्रकल्प अद्याप प्राथमिक टप्प्यात आहेत आणि पूर्ण होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमके मेट्रो मार्गिकांचे किती, कोणते प्रकल्प चालू असून ते नेमके कधी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत? यासंदर्भात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना विधानसभेत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

पाच वर्षांत १० मेट्रो मार्गिकांना मंजुरी

Mumbai Metro : फडणवीस यांनी सांगितले की, २०१४ ते २०१९ दरम्यान १० मेट्रो लाईन्सला मान्यता देण्यात आली. काही मार्गिका पूर्ण झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींचे बांधकाम सुरू आहे.

Economic survey : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित

Mumbai Metro : महत्त्वाचे मुंबई मेट्रो प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थिती

मेट्रो टप्पा २ अ – १९ जानेवारी २०२३ रोजी कार्यान्वित.

मेट्रो टप्पा २ ब – डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होण्याची शक्यता.

मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) – ८० टक्के काम पूर्ण, मात्र भिवंडी-कल्याण टप्प्यात पुनर्वसनाची अडचण, त्यामुळे भूमिगत मार्गिकेचा विचार.

मेट्रो ३ (कफ परेड-सीप्झ) – ९५ टक्के काम पूर्ण, जून २०२५ पर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता.

वडाळा-ठाणे-कासारवडवली मार्गिका – ७९ टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२७ दरम्यान विविध टप्प्यांत सुरू होणार.

कासारवडवली-गायमुख मार्गिका – ८८ टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होईल.

मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर-विक्रोळी-कांजूरमार्ग) – ७८ टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२६ पर्यंत सेवा सुरू होणार.

मेट्रो ७, ९, आणि ७ अ (दहिसर-मीरा भाईंदर मार्गिका) – ९५ टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होणार.

अंधेरी-मुंबई विमानतळ मार्गिका – ५५ टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता.

मेट्रो ११ (कल्याण-तळोजा) – केवळ ६ टक्के काम पूर्ण.

२०२५ ते २०२७ दरम्यान मोठ्या प्रमाणावर मेट्रो सेवा सुरू होणार

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, २०२५, २०२६ आणि २०२७ या तीन वर्षांत महत्त्वाचे मुंबई मेट्रो प्रकल्प पूर्ण होऊन एमएमआर परिसरात विस्तृत मेट्रो नेटवर्क उपलब्ध होईल.

मुंबई खड्डेमुक्त कधी होणार?

मुंबई खड्डेमुक्त करण्याबाबत एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणेचा उल्लेख करत त्याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २७ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील १४२० रस्त्यांपैकी ७४६ रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२७ पर्यंत संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

कोस्टल रोड प्रकल्पाची सद्यस्थिती

बांद्रा-वर्सोवा – काम प्रगतीपथावर.

वर्सोवा-मढ – कंत्राट दिले गेले.

वर्सोवा-भाईंदर – कंत्राट मंजूर.

मढ-विरार – केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवला जात आहे.

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक मुंबई मेट्रो प्रकल्प (Mumbai Metro) वेगाने सुरू आहेत. येत्या काही वर्षांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होईल. तसेच कोस्टल रोड (Coastal Road) चालू झाल्यावर वेस्टर्न साईड पूर्णपणे वाहतूक कोंडीविरहीत होईल, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -