मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याचे नाव निशांत त्रिपाठी असे आहे. पत्नी आणि तिच्या मावशीच्या छळाला वैतागून निशांत त्रिपाठीने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्याआधी निशांतने तो ज्या कंपनीत नोकरी करत होता त्या कंपनीच्या वेबसाईटवर एक पत्र अपलोड केले. या पत्रात त्याने आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. तसेच निशांतने आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या पत्रातून, ‘माझ्या आईपासून दूर राहा’ अशी विनंती पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींना केली आहे.
Economic survey : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित
निशांतने मुंबईतील हॉटेलची खोली बुक केली होती. याच खोलीतून त्याने कंपनीच्या वेबसाईटवर आत्महत्येचे कारण नमूद केलेले पत्र अपलोड केले. यानंतर खोलीतच त्याने गळफास घेतला. लवकर कोणाला कळू नये यासाठी हॉटेलच्या खोलीत प्रवेश करतानाच त्याने दरवाजावर ‘डू नॉट डिस्टर्ब’ अशी पाटी लावली होती.
नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक, कामकाज तहकूब
हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी निशांतची पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे.
हॉटेलच्या विशिष्ट खोलीतून अनेक तासांपासून कोणी बाहेर आलेले नाही आणि तिथून एकही ऑर्डर आलेली नाही हे बघून व्यवस्थापनाने स्वतःकडे असलेल्या चावीचा वापर करुन खोलीत प्रवेश केला. खोलीत शिरताच हॉटेलच्या कर्मचाऱ्याला निशांत बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे.