
मुंबई : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी दि. २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.नाशिक मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेपासून प्रारंभ झाला. (MHADA Project)

मुंबईसाठी हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट जारी मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. यात मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट ...
सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना दि. २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दि. २१ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दि. २१ मार्च रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. मुख्य अधिकारी आवळकंठे म्हणाले की, नाशिक मंडळाची ही सोडत दोन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण ३०० सदनिकांचा समावेश असून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला इच्छुक अर्जदारांनी भेट द्यावी. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २०२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अनामत रकमेचा भरणा अर्जदाराने करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. (MHADA Project)