पंचकुला : अंबाला येथील हवाई दलाच्या विमानतळावरुन उड्डाण केलेले जॅग्वार विमान हरियाणातील पंचकुलात कोसळले. वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने विमानातून बाहेर उडी मारली. यामुळे वैमानिक सुरक्षित आहे. जॅग्वार ज्या भागात कोसळले ती निर्मनुष्य जागा होती, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. नियमानुसार हवाई दलाने अपघाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार नियमित प्रशिक्षणासाठी जॅग्वार विमानाने अंबाला येथील हवाई दलाच्या विमानतळावरुन उड्डाण केले होते. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान हरियाणातील पंचकुलात कोसळले. अपघात शुक्रवार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजता झाला. चौकशीअंती अपघाताबाबतची आणखी माहिती हाती येईल.