Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसाप्ताहिकअर्थविश्व

सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात

सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात
मुंबई : केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार मागील दहा वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या नऊ महिन्यांत महाराष्ट्राने प्राप्त केली. राज्यात २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत एक लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. ही मागील दहा वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. ही कामगिरी करत महायुती सरकारने स्वतःचाच २०१६ - १७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अद्याप २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील शेवटची तिमाही पूर्ण व्हायची आहे.





अहवालात महाराष्ट्रानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकमध्ये २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत फक्त १६ हजार ६५१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर अहवालात दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात एक लाख २२ हजार ७८३ कोटी रुपये एवढी जास्त परकीय गुंतवणूक आली आहे.



परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशातले कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या आसपास पण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि या यशाचे श्रेय महायुतीतील सर्व घटक पक्षांचे आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 
Comments
Add Comment