
सोलापूर : घरगुती गॅस सिलिंडचा स्फोट होऊन घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य व छप्पर जळून घरातील दिव्यांग व्यक्तीचा भाजल्याने मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जेऊर (ता. अक्कलकोट) शिवारातील वस्तीवर घडली. घटनेची अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. इरण्णा मलकप्पा म्हेत्रे (वय ५५, रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) असे मृताचे नाव आहे. रेवणसिद्ध मलकप्पा म्हेत्रे (वय ४५, रा. गौडगाव बु, ता. अक्कलकोट) यांनी पोलिसांना सांगितले की ते कुटुंबासह जेऊर शिवारातील शेतात राहण्यास आहेत. इरण्णा मलकप्पा म्हेत्रे हा दिव्यांग होता.

मुंबई : देशातील L & T कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बिहार आणि ओडिशा सरकारच्या विशेष व्यवस्थेतून प्रेरित होऊन देशात पहिल्यांदाच एका ...