मुंबई : पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि होळी आणि उन्हाळी हंगामात वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई सेंट्रल आणि दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोन वेळा अतिजलद वातानुकूलित विशेष गाडी चालवणार आहे.
‘उंटावरचे शहाणे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न
गाडी क्रमांक ०९००३/०९००४ मुंबई सेंट्रल-दिल्ली (आठवड्यातून दोन वेळा)अतिजलद वातानुकूलित विशेष क्रमांक ०९००३ मुंबई सेंट्रल-दिल्ली सुपरफास्ट स्पेशल दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दिल्लीला पोहोचेल. ही गाडी ७ ते २८ मार्च पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९००४ दिल्ली-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल दर बुधवार आणि शनिवारी दिल्लीहून दुपारी १.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी ८ ते २९ मार्च पर्यंत धावेल.
ही गाडी बोरिवली, वापी, वलसाड, उधना, वडोदरा, साबरमती, महेसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, फालना, मारवाड, बेवार,अजमेर,किशनगढ,जयपूर, गांधीनगर जयपूर, बंदिकुई, अलवर, रेवाडी, गुडगाव आणि दिल्ली कॅन्ट स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या गाडीला एसी २-टियर,एसी ३-टियर कोच असतील.