Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीमिठी नदी सफाई कामांच्या निविदेतच घोटाळा; एसआयटी मार्फत चौकशीची मागणी

मिठी नदी सफाई कामांच्या निविदेतच घोटाळा; एसआयटी मार्फत चौकशीची मागणी

मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर तसेच आजवर देण्यात आलेल्या सफाईच्या कामांबाबत मनसेने तीव्र आक्षेप नोंदवून आता काढण्यात आलेली निविदा रद्द करून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलतांना केली.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांना निवदेन देवून त्यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याबाबत तसेच मुंबईतील मोठ्या नाल्यातील सफाई कामांच्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. या निविदेनामध्ये बाळा नांदगावकर यांनी असे नमुद केले आहे की, हे नालेसफाईचे काम एकाच कंपनीला देण्याचा प्रयत्न असून यात डी बी एंटरप्रायझेसस एमएम रनोजा डेव्हलपमेंट कार्पौरेशन, त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट आणि तनिषा एंटरप्रायझेस यांनाच काम मिळेल अशाप्रकारचे या निविदेत अट घालण्यात आल्याचे म्हटले आहे.

माटुंगा रेल्वे स्थानक, फुल बाजार परिसरातील अतिक्रमणांचा विळखा सुटला

मिठी नदीमध्ये शिल्टपुशर आणि स्टक्चलर आदींचा वापर केला जात असून या मशिनची मक्तेदारी केवळ एकाच कंपनीकडे आहे. या कंपनीला प्रत्येक कामांसाठी दोन वर्षांसाठी ९ कोटी रुपये द्यावे लागते आणि या मशिनची एनओसी ज्यांच्याकडे नसेल त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे या शिल्टपुशर मशिनची अट घालून ठराविक कंपन्यांना काम देण्याचा आणि या मशिनच्या भाड्यापोटी जाणारे पैसे गृहीत धरता महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे केरळमध्ये जी मशिन ९० लाखांमध्ये मिळते, त्याच मशिनचे भाडे तीन विभागांमध्ये दिल्या जाणाऱ्या कंत्राट कामांमध्ये प्रत्येकी कंत्राटदारांकडून ९ कोटी रुपये घेतले जातात. त्यामुळे या मशिन्स महापालिकेने स्वत: खरेदी करून उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशाप्रकारची मागणीही नांदगावकर यांनी केली आहे. यासर्व प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी करावी तसेच फौजदारी गुन्हेही दाखल करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -