Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai News : मुंबई शहर व उपनगरांमध्ये एकही रस्ता आता खोदला जाणार...

Mumbai News : मुंबई शहर व उपनगरांमध्ये एकही रस्ता आता खोदला जाणार नाही!

महापालिका आयुक्तांचे फर्मान जारी, अधिकाऱ्यांना लावले कामाला

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी घेणार काळजी

मुंबई : मुंबईतील (Mumbai News) रस्ते काँक्रिटीकरणाची (Road concreting) कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्यांचीही कामे सुरू आहेत. एकदा रस्त्याचा विकास झाला की, त्या रस्त्यावर खोदकाम, चर करायला तत्काळ प्रभावाने मनाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले आहेत.

‘उंटावरचे शहाणे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते), तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा १ मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा २ मधील ५० टक्के कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

निर्देशाचे पालन करण्याच्या सूचना

सर्व परिमंडळ उपआयुक्त, विभागीय सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक), प्रमुख अभियंता (पूल), प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या), जल अभियंता, नगर अभियंता, प्रमुख अभियंता (मलनिस्सारण प्रचालन), प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प), प्रमुख अभियंता (विकास नियोजन) आदी खात्यांनी या निर्देशांचे पालन करावे, असे महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामांचा घेतला आढावा

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते (Road concreting) कामांचा २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आढावा घेतला. अधिकारी, कंत्राटदार व गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन रस्ते कामांना अधिक गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी ३१ मे २०२५ नंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचे खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -