मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूक सध्या महिलांना भुरळ घालत आहे. अशातच भारतातील महिला गुंतवणूकदारांची संख्याही वेगाने वाढत आहे. यात महिला मोठ्या संख्येने म्यच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. महिलांच्या वाढत्या गुंतवणुकीमुळे त्यांचे अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट मार्च २०१९मध्ये ४.५९ लाख कोटी रूपयांनी वाढून मार्च २०२४मध्ये ११.२५ लाख कोटी रूपये झाले. ही संख्या दुप्पट आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महिला गुंतवणूकदार एकूण व्यक्तिगत गुंतवणुकीच्या एयूएमच्या ३३ टक्के भागीदारीचे प्रतिनिधित्व करतात. रिपोर्टनुसार, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांच्या संख्येतही वाढ होत आहे. आता प्रत्येक चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे.
या व्यतिरिक्त महिलांसाठीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओच्या सरासरी आकारात वाढ पाहायला मिळाली. मार्च २०१९ आणि मार्च २०१४ या दरम्यान त्यांच्या फोलिओ आकारात २४ टक्क्यांची वाढ झाली. ही मार्च २०२४मध्ये वाढून १०.६२ लाख कोटी रूपये झाली. मार्च २०१९मध्ये ही रक्कम २.६६ लाख कोटी रूपये होती.
या वाढीचे कारण एसआयपीची वाढती क्रेझ आहे. १८ ते ३४ वर्ष वयोगटामध्ये एसआयपीमध्ये गुंतवणुकीची क्रेझ वाढत आहे. या वयोगटाच्या एसआयपी एयूएममध्ये गेल्या पाच वर्षांत २.६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली.