

मुंबई श्री चा धमाका ७ मार्चला
'मुंबई श्री'मध्ये मुंबईतील २५० पेक्षा जास्त शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार मुंबई : मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका ...
भारतीय शरीरसौष्ठवाचा कणा असलेल्या मुंबई शरीरसौष्ठवाला सर्वदृष्टीने बलशाली बनवण्याचे ध्येय साकारण्यासाठी खानविलकर गेली अनेक वर्षे झटत आहेत. शरीरसौष्ठव हा खेळ सर्वसामान्यांचा आणि होतकरू मुलांचा आहे. शरीरसौष्ठवात मुंबईसारखी अफाट गुणवत्ता देशात कुठेही नाही. पण जागतिक स्पर्धा म्हटली की आपले असंख्य खेळाडू प्रचंड खर्चाअभावी माघार घेतात आणि खरी गुणवत्ता मागेच राहाते. या गुणवत्तेला पाठबळ देण्यासाठी, पुढे आणण्यासाठी मुंबई श्री सारखा दुसरा मंच असू शकत नाही. त्यामुळे या स्पर्धेतील विविध गटात जोरदार कामगिरी करणार्या तीन खेळाडूंना येत्या १४ ते १८ जूनदरम्यान युएईमध्ये होत असलेल्या आगामी आशियाई स्पर्धेत आर्थिक पाठबळ देणार असल्याचे खानविलकरांनी जाहीर केले. फक्त ते तीन गुणवत्ता असलेले पीळदार खेळाडू कोण असतील, हे मुंबई श्री दरम्यानच कळेल. त्यांची निवड संघटना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केवळ पारंपरिक खेळांसाठी मैदान उपलब्ध
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत कौशल्य विकास, ...
मुंबईसह राज्य संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर खानविलकरांनी आघाडीच्या शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्टया श्रीमंत करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. आमचे ध्येय खडतर आहे आणि ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वासही खानविलकरांनी याप्रसंगी बोलून दाखविला. या ध्येयमुळेच खेळाडूंना जास्त रकमांची रोख पुरस्कार देण्याचे आणि जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंना लागणारे पूर्ण सहकार्य करण्यासाठी संघटना आणि मी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.