मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळवरुन ११ कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोन्याची पावडर सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ०२ ते ०५ मार्च २०२५ दरम्यान, मुंबईतील सीएसएमआय आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्ज आणि सोन्याच्या तस्करी प्रकरणी एकाला अटक केली आहे.अटक केलेल्या प्रवाशाकडून १.१८ किलो कोकेन जप्त केले आहे तर ४८५ ग्रॅम वजनाची सोन्याची पावडर जप्त केली आहे.
युगंडा देशातून आलेल्या प्रवाशाकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत बाजारपेठ अंदाजे ११.८ कोटी रुपये आहे. तर ४८५ ग्रॅम वजनाची सोन्याची पावडरची किंमत ४० लाख रुपयांच्या तुलनेत कमी होती.