Saturday, April 19, 2025
Homeदेशसोन्याच्या तस्करीत आयपीएसची मुलगी असलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीचा हात

सोन्याच्या तस्करीत आयपीएसची मुलगी असलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीचा हात

बंगळुरू : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले.

अ‍ॅक्‍ट्रेस नव्हे स्‍मगलर!

रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. घरामधून एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. यानंतर रान्याला चौकशीसाठी डीआरआयचे पथक नागवारा येथील कार्यालयात घेऊन गेले. डीआरआयच्या हाती आलेल्या माहितीनुसार रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत असल्याचे कळले तेव्हा कारवाई करण्याचा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मागील काही काळापासून रान्याच्या हालचालींवर डीआरआयचे अधिकारी लक्ष ठेवून होते. प्रत्येकवेळी ती केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर पोलिसाच्या मदतीने तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडत होती. यामुळे रान्याने आतापर्यंत किती कोटी रुपयांची तस्करी केली आणि फक्त सोन्याची तस्करी केली आणि इतर वस्तूंचीही तस्करी केली याचा तपास सुरू आहे.

या प्रसिद्ध गायिकेने झोपेच्या गोळ्या खात केला आत्महत्येचा प्रयत्न

रान्याच्या तस्करीचा संबंध एका बड्या राजकीय नेत्याशी असल्याची चर्चा आहे. नेत्याच्या सूचनांनुसार सोन्याची तस्करी सुरू होती, असे समजते. या प्रकरणी संबंधित नेत्याचीही लवकरच डीआरआय चौकशी करण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडच्या ‘या’ हिट अभिनेत्री लग्न न करताच झाल्या आई!

सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपात रान्याला पकडण्यात आले. पण रान्याने वेगळाच दावा केला. मला सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले; असे रान्याने सांगितले. रान्याचे वडील आणि कर्नाटक पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाचे महासंचालक डीजीपी रामचंद्र राव यांनी माहिती मिळताच धक्का बसला, अशी प्रतिक्रिया दिली. रान्याचे लग्न झाले आहे आणि मागील अनेक दिवसांपासून ती आमच्यासोबत नाही त्यामुळे तिनं नेमकं काय केलंय आणि का केलंय या विषयावर मला बोलता येणार नाही; असे ते म्हणाले.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केले अत्याचार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -