Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीकणकाधीश : कणकवलीच्या सद्गुरु भालचंद्र महाराजांची गाथा मराठी रुपेरी पडद्यावर

कणकाधीश : कणकवलीच्या सद्गुरु भालचंद्र महाराजांची गाथा मराठी रुपेरी पडद्यावर

मुंबई : गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभुती देण्याचं काम अनेक अध्यात्मिक गुरुंनी केलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपश्चर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण केले असे सद‌्‌गुरू भालचंद्र महाराज पण देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती. त्यांच्या कृपेची प्रचिती आजही असंख्य भाविकांना येते. योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे.

कणकवलीमध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त, निर्माते हरेश शशिकांत आईर आणि सौ.अमृता हरेश आईर यांनी ‘कणकाधीश’ या मराठी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट ‘कणकाधीश’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

योगतपस्वी, कणकाधिपती परमहंस भालचंद्र महाराजांची महती, अध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीती, महाराजांच्या जीवनचरित्रातील अनुभवांचे भावस्पर्शी सादरीकरण प्रत्येकाला महाराजांच्या सान्निध्याची नक्कीच अनुभूती देईल, असा विश्वास मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सचे संस्थापक आणि ‘कणकाधीश’ चित्रपटाचे निर्माते हरेश शशिकांत आईर यांनी व्यक्त केला.

मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘कणकाधीश’ चित्रपटाचे लेखन प्रल्हाद कुडतरकर यांचे तर दिग्दर्शन विविध कोरगांवकर करणार आहेत. छायाचित्रण कौशल गोस्वामी, संगीत दिग्दर्शन साई-पीयुष यांचे आहे. कलादिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. सहनिर्माते मिलिंद शिंगटे आहेत. या चित्रपटासाठी छत्रपती स्टुडिओ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -