एफआयआर नोंदविण्याच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share Market) भ्रष्टाचार आणि नियामक कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बूच (Madhabi Puri Buch) आणि बीएसईच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मंगळवारी चार आठवड्यांसाठी स्थगिती दिली. त्यामुळे बूच यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
Mhada : म्हाडा भवनातील पैशांच्या उधळण प्रकरणी अर्जदारांची उद्या पुन्हा सुनावणी!
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमार दिगे यांच्या एकल खंडपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. विशेष न्यायालयाने या प्रकरणाची सखोल पडताळणी न करता आणि संशय़ितांची भूमिका न तपासता एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणात तक्रार करणारे सपन श्रीवास्तव यांना उत्तर देण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठीही चार आठवड्यांची मुदत दिली आहे. (Madhabi Puri Buch)