मुंबई : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गंभीर आरोप केला. जयकुमार गोरे यांनी महिलेला निर्वस्त्र फोटो पाठवले, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणात प्रसारमाध्यमांसमोर येऊन मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले.
माझ्यावर जे आरोप झाले ते सहा वर्षे जुने प्रकरण आहे. आरोप झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयालाच आता काही वर्षे झाली आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे त्या प्रकरणाचा अर्धवट संदर्भ देऊन माझी बदनामी करण्याचा विरोधकांचा राजकीय डाव आहे. हा प्रकार लक्षात आला आहे. मी आरोप करणाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडणार आहे. तसेच बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे; असे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.