प्रत्येक प्रभागांमध्ये सरासरी उणे ३३ ते ३६ टक्के दराने मिळवली कामे
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेच्या वतीने मुंबईतील तब्बल १७५८ उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे आदींसह मोकळ्या जागांची दैनंदिन देखभाल करण्यासाठी विभाग कार्यालय निहाय कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. परंतु डिसेंबरपासून या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या कामांना मंजुरी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासक स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच दोन महिने आधीच या कंत्राटदारांना कामे बहाल करण्यात आली होती.
विशेष म्हणजे २४ विभागांसाठी नियुक्त केलेल्या सर्व कंत्राटदारांनी सरासरी ३३ ते ३६ टक्के उणे दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला. जिथे एवढ्या कमी दरात बोली लावून काम मिळवल्यामुळे महापालिकेने यापूर्वीच्या निविदा प्रक्रियेमध्ये निविदेत भाग घेणाऱ्या कंपन्यांची अनामत रक्कम जप्त केली होती, तिथे तेवढाच दर आकारुन काम मिळवण्याचा प्रयत्न होवूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने अशाच प्रकारच्या मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी काढलेल्या निविदेत महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा उणे ३४ ते ३६ टक्के दराने बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केल्याने तत्कालिन अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी सर्व कंत्राटदारांची अनामत रक्कम जप्त करून फेरनिविदा मागवली होती. महापालिकेत अशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आलेला असताना प्रशासनाने उणे दराने भाग घेणाऱ्या कंपनींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना मंजुरी आधीच काम देण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील एकेक परिमंडळांसाठी स्वतंत्र आणि उर्वरीत प्रभागांसाठी स्वतंत्र निविदा काढली होती. ही निविदा वादात अडकल्याने पुन्हा नव्याने प्रभाग निहाय निविदा काढण्यात आली आहे.
प्रभागनिहाय नियुक्त कंत्राटदार, कंत्राट कंपनी, जागांची संख्या
ए विभाग (५७)
कंत्राट कंपनी: वैभव एंटरप्राइजेस (- ३६.३६ टक्के)
कंत्राट रक्कम: ३.२६ कोटी रुपये
बी विभाग (२६)
कंत्राट कंपनी: जे. के .कंट्रक्शन (- २१.०१ टक्के)
कंत्राट रक्कम: ६२.४७ लाख रुपये
सी विभाग(२१)
कंत्राट कंपनी: कपूर ट्रेडिंग (-३५.९९ टक्के)
कंत्राट रक्कम : १.००कोटी रुपये
डी विभाग(८५)
कंत्राट ई विभाग(५७)कंपनी: एस्थेटिक लँडस्केपिंग (- ३३.९३ टक्के)
कंत्राट रक्कम : २.४८कोटी रुपये
कंत्राट कंपनी: मावळ कंस्ट.क्शन
कंत्राट रक्कम: १.८२कोटी रुपये
एच पूर्व विभाग (३८)
कंत्राट कंपनी: जगदंबा कॉर्पोरेशन (-३६.९९टक्के)
कंत्राट रक्कम: २. ७७ कोटी रुपये
एच पश्चिम विभाग (७९)
कंत्राट कंपनी: हर्षिल इंटरप्राईजेस(-३७.८२टक्के)
कंत्राट रक्कम: ६.५१ कोटी रुपये
के पूर्व विभाग (११५)
कंत्राट कंपनी: हर्षिल इंटरप्राईजेस(-३६.८३टक्के)
कंत्राट रक्कम: ९.५७ कोटी रुपये
के पश्चिम विभाग (१२६)
कंत्राट कंपनी: कमला सिव्हीलकॉन इन्फ्रा
कंत्राट रक्कम: १९.१५ कोटी रुपये
एल विभाग (७३)
कंत्राट कंपनी: राठोड ब्रदर्स (-३२.५१टक्के)
कंत्राट रक्कम: ५.७४ कोटी रुपये
एम पूर्व विभाग(९०)
कंत्राट कंपनी: राजदीप इंटरप्राईजेस(-३६.०९टक्के)
कंत्राट रक्कम: ४.७० कोटी रुपये
एम पश्चिम विभाग (८८)
कंत्राट कंपनी: अर्थ साल्वेजिंग कंट्रक्शन कॉर्पोरेशन(-३२. ११टक्के)
कंत्राट रक्कम: ७.२४ कोटी रुपये
जी दक्षिण विभाग ( ६०)
कंत्राट कंपनी: स्वस्तिक कंट्रक्शन (-३३.९३ टक्के)
कंत्राट रक्कम: २.५७ कोटी रुपये
जी उत्तर विभाग (४४)
कंत्राट कंपनी: श्री इंटरप्राईजेस (-३७.१९टक्के)
कंत्राट रक्कम: २.०३ कोटी रुपये
एफ दक्षिण विभाग( ५३)
कंत्राट कंपनी: रिद्धी इंटरप्राईजेस (-३८.९९ टक्के)
कंत्राट रक्कम: ३.६८ कोटी रुपये
एफ उत्तर विभाग (११४)
कंत्राट कंपनी: सूर्या उदास कंट्रक्शन (-३२.५० टक्के)
कंत्राट रक्कम: ५.४० कोटी रुपये
पी दक्षिण विभाग( ६४)
कंत्राट कंपनी: बिलिव्ह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (-३५.२०टक्के)
कंत्राट रक्कम: ७.९८ कोटी रुपये
पी उत्तर विभाग (९८)
कंत्राट कंपनी: बिलिव्ह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (-३३.४० टक्के)
कंत्राट रक्कम: १३.१० कोटी रुपये
आर दक्षिण विभाग(८०)
कंत्राट कंपनी: आर.शहा सिविल इंजिनिअर प्रा.लि. (-२८.५४ टक्के)
कंत्राट रक्कम: १०.३५ कोटी रुपये
आर मध्य विभाग : (९०)
कंत्राट कंपनी: ए एस बी इंटरप्राईजेस (-३५.०० टक्के)
कंत्राट रक्कम: ९.६१ कोटी रुपये
आर उत्तर विभाग (८०)
कंत्राट कंपनी: वरुण कंट्रक्शन (-३५.१९ टक्के)
कंत्राट रक्कम: ९.९६ कोटी रुपये
एन विभाग (६९)
कंत्राट कंपनी: विरल असोशिएटेस(-३०.९० टक्के)
कंत्राट रक्कम: ४.८१ कोटी रुपये
एस विभाग (७३)
कंत्राट कंपनी: राठोड ब्रदर्स (-२८.५१ टक्के)
कंत्राट रक्कम: ०८.०१ कोटी रुपये
टी विभाग (७८)
कंत्राट कंपनी: आर. एस . कंट्रक्शन(- २८.०६) टक्के)
कंत्राट रक्कम: ०७.०१ कोटी रुपये