Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीMinister Mangal Prabhat Lodha : मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवू -...

Minister Mangal Prabhat Lodha : मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवू – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामधील शासकीय संस्थेतील औद्योगिक क्षेत्रात कौशल्याच्या आधारावर महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या मिलराईट मेंटेनेंस कामगारांच्या पद्दोनतीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहे. या संदर्भात प्रशासकीय आढावा घेऊन यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिले. मंत्रालयात सोमवारी या संदर्भात आमदार सत्याजित तांबे यांनी लोढा यांची भेट घेऊन मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबबत चर्चा केली.

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मिळणार महिला दिनाचं गिफ्ट

सात महिन्यांपूर्वी शासनाने मिलराईट मेटेनेन्स मेकॅनिक हे वर्ग तीनचे पद सेवा नियमित केले आहे. मात्र अद्याप या कामगारांना पदोन्नती दिली गेली नसल्याचे आमदार सत्याजित तांबे यांनी मंत्री श्री लोढा यांच्या निदर्शनाला आणले. पदभरती होण्यापूर्वी नव्याने अधिसूचित झालेल्या वर्ग तीनच्या सेवा प्रवेश नियमानुसार मिलराईट कामगारांना पदोन्नती द्यावी,अशी मागणी तांबे यांनी केली आहे. मंत्री लोढा यांनी या प्रश्नाबाबत बोलताना स्पष्ट केले की, कोणत्याही कामगाराचा न्याय्य हक्क हिरावला जाणार नाही. शासनाच्या नियमानुसार सर्व बाबींची पडताळणी करून मिलराईट कामगारांना न्याय दिला जाईल.

विविध औद्योगिक प्रकल्पात रेखाचित्रांनुसार नवीन मशीन बसवणे, मशीनचे भाग बसवणे किंवा बदलणे, वेल्डर किंवा हायड्रॉलिक बोल्टर सारख्या विशेष साधनांचा वापर करून महाकाय मशिन्स कार्यान्वित करणे असे जिकिरीचे आणि जोखमीचे काम करणारा हा मिलराईट मेंटेनन्स कामगार आहे. मिलराईट फिटर संदर्भातील अभ्यासक्रम विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. औद्योगिक प्रकल्प, वीज निर्मिती, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रात मिलराईट फिटर्सना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -