इगतपुरी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू असून, यामुळे महिलांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. गावठी दारू, अमली पदार्थ, जुगार आणि सट्टेबाजी खुलेआम सुरू असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्या तरी, पोलीस कारवाई संदर्भात केवळ आश्वासनांवरच समाधान मानत लागत असल्याची स्थिती आहे.
गावठी दारू, अमली पदार्थांचा बाजार तेजीत सुरु असून गांजा, मटका, जुगार, काळा पिवळा, गावठी कट्टे, गावठी दारूचे कॅन, बनावट इंग्लीश दारू असे अनेक धंदे राजरोसपणे सुरु आहेत. तसेच अवैध प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता”- पंकजा मुंडे
मात्र, पोलिसांकडून यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीबेरात्री टवाळ खोरी वाढत चालली आहे. सहज उपलब्ध होत असल्याने गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले असून, टोळक्यांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. गुटखा आणि इतर नशेच्या वस्तू वाइन शॉपच्या बाहेरील टपऱ्यांवर खुलेआम विक्रीस आहेत.
शहरात वीस ते पंचवीस भंगारांचे दुकाने थाटून बसलेले आहेत. त्याचप्रमाणे घोटीमध्ये घोटी सिन्नर महामार्गावरील वजन काट्याच्या बाजूला अवैध काटा सुरु असून त्याच बरोबर इतर ही चार ते पाच ठिकाणी अवैध काटा जोमाने सुरु आहे. यामध्ये बाहेरून आलेल्या गाड्यांमधील स्टील इतर धातू भरलेले असतात. चालक ते स्टील अवैध काटा असलेल्या ठिकाणी जुन्या शेडमध्ये उतरून घेऊन ते स्टील नाशिक येथे निम्म्या रात्री विकले जातात.