दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकले आहे. एकीकडे विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले आणि दुसरीकडे श्रेयस अय्यरचे मात्र अर्धशतक केवळ ५ धावांनी हुकले.
पहिले दोन विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने सावधगिरीने खेळ करत संघाला १००हून अधिक धावा गाठून दिल्या. कोहलीने ५५ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तर श्रेयस अय्यरला ४५ धावा करता आल्या.
The Chase Master Virat Kohli with yet another 50* against Australia 👏🏻 #INDvsAUS pic.twitter.com/UbYG2GgjDF
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 4, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने ७३ धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरेने ६१ धावा ठोकल्या.